रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त निबंध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर येथील श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त निबंध स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर येथील श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा विद्यार्थी विकास विभाग आणि नाईक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. [ads id="ads1"] 

  या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री. हेमंत देविदास नाईक चेअरमन ,रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ रावेर हे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सतीश रामचंद्र पाटील अध्यक्ष, रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ रावेर हे होते. स्पर्धा समन्वयक डॉ.जी.आर. ढेंबरे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला निबंध स्पर्धा आयोजनामागील भूमिका मांडली. [ads id="ads2"] 

  १२ महाविद्यालयातून १४० पेक्षा जास्त निबंध या स्पर्धेसाठी उपलब्ध झाल्याचे डॉक्टर ढेंबरे यांनी सांगितले. सिनेट सदस्य डॉ. अनिल पाटील यांनी स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले आहेत. या उपक्रमांमधून स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तरुणांना माहिती झाला. असे आपल्या मनोगतात सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. व्ही. दलाल यांनी स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाच्या विविध कार्यक्रमांच्या कार्याचा आढावा यावेळी मांडला. 

हेही वाचा :- दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू तर दोन जण जखमी ; सावदा ते कोचूर दरम्यानची घटना

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

महाविद्यालयातील ९०० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचे प्राचार्य डॉ. दलाल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.डी. धापसे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक एस. बी. धनले यांनी मानले. या कार्यक्रमाला सिनेट सदस्य डॉक्टर अनिल पाटील ,उपप्राचार्य डॉक्टर व्ही.बी. सूर्यवंशी , नॅक समन्वयक डॉ.एस.आर. चौधरी ,डॉक्टर जे. एम. पाटील हे उपस्थित होते. प्रा. वैभव जोशी, प्रा. मनोहर तायडे तसेच प्रा.एस.डी.धापसे यांनी या निबंध स्पर्धेचे परीक्षण केले.या विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धेत कु.नयना अनिल महाजन हिने प्रथम क्रमांक मिळवला. ,कु. सोनल योगेश पाटील या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर तृतीय क्रमांक कु.तनुषा संजय महाले या विद्यार्थिनींनी मिळवला. प्रथम क्रमांकासाठी 3O75, द्वितीय क्रमांक साठी 2075 , तर तृतीय क्रमांकासाठी 1575 रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!