सावदा (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दोन दुचाकींची सावदा ते कोचूर असलेल्या वळणावर समोरा-समोर धडक झाली असून यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोन जखमी झाले आहेत.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, सावदा ते कोचूर (Savada -Kochur Road) रस्त्यावरील पहिल्याच वळणावर आज दिनांक २०ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरा-समोरून जोरदार टक्कर झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून याच अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्यानंतर सावदा(Savda) ,कोचुर(Kochur) परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ रुग्णालयात(Hospital) दाखल केले.[ads id="ads2"]
याविषयी पोलीस(Police) सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, MH १५ DV १३०६ आणि MH १९ DG ८४६७ क्रमांकांच्या बाईक यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कुणाल मधुकर साळी यांचा मृत्यू झाला असून यश किशोर धांडे आणि पुष्कर हेमा बढे हे दोन जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
जखमी झालेले दोन्ही जण हे चिनावल येथील रहिवासी असून त्यांना फैजपूर (Faijpur) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याविषयी सावदा पोलीस (Savda Police Station) स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.