यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या


यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी) यावल तालुक्यातील अंजाळे (Anjale Taluka Yawal Dist Jalgaon) गावातील लग्न घटकाजवळ आलेल्या तरूणी आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये (Yawal Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. मीनल निवृत्ती भागवत (२३, नवीन प्लाट क्षेत्र, अंजाळे ता. यावल जि.जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे.[ads id="ads1"] 

गळफास घेत संपवली जीवनयात्रा

या विषयी पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मिनल निवृत्ती भागवत या तरुणीने शनिवारी, १५ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केली.[ads id="ads2"] 

   याबाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत (५८) यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये (Yawal Police Station) अ.मृ.र ६५ / २०२२ प्रमाणे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!