जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अनिल चौधरी यांच्या समवेत डावीकडून जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन व युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील प्रहार जनशक्ती पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील (रा. चोरवड ता. रावेर) यांनी काही दिवसा पूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्या पाठोपाठ रावेर येथील माजी नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.[ads id="ads1"]
प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिंदे टा पाठिंबा देत, ठाकरे यांच्या मंत्री मंडळाचा पाठिंबा काढून घेतला होता. यानंतर झालेल्या सत्ता परिवर्तनाने त्यांच्याही मंत्री पदाचा निर्णय देखील प्रलंबित आहे. [ads id="ads2"]
यामुळे पार्टीत सुरू असलेल्या इनकमिंग ला ब्रेक लागला असून, आता तर राजीनामे सत्र सुरू झाले असून, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील (रा. चोरवड ता. रावेर) यांनी काही दिवसा पूर्वी दिला होता. त्या पाठोपाठ रावेर येथील माजी नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी देखील जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अनिल चौधरी यांना धक्का मानला जात आहे.