धरणगाव नगरपरिषदेला करवाढी विरोधात "सह्यांचे निवेदन" सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



📗पायाभूत सुविधा नाही तर करवाढ नाही; जागरुक नागरिक

धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर

धरणगाव : धरणगाव नगर परिषदकडून २०% वाढीव करवाढ संदर्भात दिलेल्या नोटीसला हरकत म्हणून न.प.च्या विरोधात जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांच्या नेतृत्वात शेकडोंच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून दि.२१ ऑक्टो,२२ शुक्रवार रोजी ५०० हून अधिक हरकती अर्ज व सह्यांचे निवेदन सादर करण्यासाठी नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. [ads id="ads1"] 

                यावेळी नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर, नगर अभियंता सुमित पाटील, बांधकाम अभियंता सुमित पाटील यांना जेष्ठ नागरिक सावित्रीबाई माळी, शोभाबाई महाजन, दशरथ बापू महाजन, कडूजी महाजन, निजामोद्दिन शेख, सुधाकर मोरे, भिमराज पाटील, राजू ओस्तवाल, सिताराम मराठे, रविंद्र निकम, पी.डी.पाटील, गोरखनाथ देशमुख, लक्ष्मणराव पाटील, आबासाहेब राजेंद्र वाघ, आदींनी प्रातिनिधीक स्वरूपात हरकती व सह्यांचे निवेदन सादर केले. [ads id="ads2"] 

निवेदन सादर प्रसंगी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, धरणगाव शहरातला बहुतेक भाग हा ग्रामीणमध्ये येतो. शहरात कोणतेही कारखाना अथवा उद्योग, व्यवसाय नाही. बहुतांश नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे धरणगाव परिसर हा निसर्गनिर्मित दुष्काळग्रस्त आहे. अश्या ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात वाढीव घरपट्टी आकारणे कितपत योग्य आहे. शासकीय निर्देशानुसार दर ४ वर्षांनी करवाढ केली जाते परंतु मार्गदर्शक तत्वे असं सांगतात की, जर पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर ही करवाढ करण्यात येऊ नये. नगरपालिका कार्यक्षेत्रात जर पायाभूत सुविधा नसतील अथवा पुरवीत नसणार तर करवाढ करू नये. तसेच नगरपरिषद प्रशासनाने अमरावती न.पा.चे उदाहरण घेवुन वाढीव घरपट्टी चा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारली जावी, शहरात न.पा.ची एकही शाळा नाही, तरीही शिक्षण कर लावला जातो, न.प.कडून वृक्षारोपण केले जात नाही तरीही वृक्ष कर लावण्यात येतो तसेच, २० ते २५ दिवसात नळाला अनियमित तेही दूषित पाणी पुरवठा केला जातो. अश्या विविध समस्या असताना देखील करवाढ का..? असे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांच्यासह मालमत्ताधारकांनी सांगितले. 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

              यावेळी प्रथम सूर्यवंशी, आकाश बिवाल, जितेंद्र महाजन, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, अमोल महाले, आनंद पाटील, किशोर पवार, राजेंद्र पाटील, महेश्वर पाटील, हमीद बागवान, विनायक न्हावी, धनराज सोनवणे, सुदर्शन भागवत, समशेरखान पठाण, सुनील पारधी, नितीन मराठे, योगेश चौहान, दाऊ पुरभे, अविनाश मालपुरे, विश्वास बयस, महेबुब पठाण, किरण सोनवणी, सुनिल लोहार, गणेश राजपूत, विश्वास शिरसाठ, निलेश पवार, अमोल सोनार, भूषण भागवत, प्रफुल पवार, अमोल निकम, दिनेश भदाणे, नामदेव मराठे, गणेश महाजन, स्वप्नील जैन, आबा महाजन, मनीष चौधरी, लोकेश जाला शुभम मराठे, हर्षल फुलपगार, शुभम कंखरे यांसह न.प.चे अनिल पाटील, गणेश गुरव, दिपक वाघमारे यांच्यासह शहरातील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!