🔹लक्ष्मणराव पाटील यांनी केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद !.....
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी. पाटील सर
धरणगाव : धरणगाव शहरातील मालमत्ताधारकांच्या चुकीच्या सर्वेक्षणावरून धरणगाव नगर परिषद प्रशासनाने सन २०२२-२३ ते २०२५-२६ ह्या चार वर्षासाठी घरपट्टीमध्ये २०% (वीस) टक्के भरमसाठ वाढ केली असून, ही अवास्तव वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ नगर परिषदेच्या करवाढी विरोधात धरणगावातील जागरूक नागरिकांनी आज गुरुवार रोजी "स्वाक्षरी मोहीम हरकत अभियान" राबविण्यात आले. तत्पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली.[ads id="ads1"]
जवळपास १ महिन्यापूर्वी नगरपरिषद धरणगाव यांच्याकडून सर्व धरणगावकरांना नोटीस प्राप्त झाली होती. ही नोटीस २० टक्के करवाढ संदर्भात आहे, वरील मालमत्ता कर आकारणी व्यतिरिक्त शासकीय शिक्षण कर, वृक्ष कर, रोजगार हमी उपकर इ.अनुषंगिक आकारणी तरतुदीनुसार करण्यात येईल. याचा सरळ अर्थ असा की, साधारणतः २५ टक्के करवाढ... म्हणजेच सध्या जर आपण वार्षिक १००० रुपये कर भरत असाल तर नवीन वाढीनुसार आपल्याला १२५० रुपये कर भरावा लागेल. [ads id="ads2"]
शासकीय निर्देशानुसार दर ४ वर्षांनी करवाढ केली जाते परंतु मार्गदर्शक तत्वे असं सांगतात की, जर पायाभूत सुविधांचा अभाव असेल तर ही करवाढ करण्यात येऊ नये. नगरपालिका कार्यक्षेत्रात जर पायाभूत सुविधा नसतील अथवा पुरवीत नसणार तर करवाढ करू नये. त्याचप्रमाणे नगर परिषद प्रशासनाने अमरावती न.पा.चे उदाहरण घेवुन वाढीव घरपट्टी चा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारली जावी, असे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांच्यासह मालमत्ताधारकांचे म्हणणं आहे. न.प.कडून अवास्तव करवाढीच्या विरोधात सुरू असलेल्या आमच्या "स्वाक्षरी मोहीम हरकत अभियानाला" शहरातील विविध भागातील नागरिकांसह महिलांकडून उत्स्फूर्तपणे वाढता पाठिंबा व सहकार्य मिळत आहे. आज दिवसभरात जवळजवळ ४०० हून अधिक नागरीकांनी हरकती घेतल्या असून वाढीव करवाढीला कडाडून विरोध केला, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर
या मोहिम अभियानाला राबविण्यासाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, जितेंद्र महाजन, पी.डी.पाटील, धर्मराज मोरे, हाजी इब्राहीम, अविनाश बाविस्कर, भगीरथ माळी, निलेश पवार, राजेंद्र रडे, विकास पाटील, हेमंत माळी, गोरख देशमुख, प्रफुल पवार, धनराज पाटील, सुदर्शन भागवत, अमोल सोनार, भूषण भागवत, सुधाकर मोरे, आनंद पाटील, भिमराव पाटील, नईम काझी, गोपाल चव्हाण, मोहित पवार, किशोर पवार, भरत मराठे, जगदीश चौहाण, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, राजेंद्र वाघ, इसामोद्दिन पठाण, अनिल माळी, नितीन बाचपाई, डीगंबर विसावे, भोला धनगर, राजेंद्र पाटील, मिलींद शिरसाठ, भरत शिरसाठ, प्रकाश बडगुजर, करीम लाला मोमिन, अमोल माळी, सम्राट धनगर व शहरातील जागरूक नागरिक उपस्थित होते.