रावेर(ग्रामीण) तालुका प्रतिनिधी : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील इनडोअर स्टेडीयम मध्ये जळगाव क्रीडा विभाग समिती अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा दि १९ ऑक्टोबर २०२२ रोजी उत्साहात संपन्न झाल्या. [ads id="ads1"]
स्पर्धेत पुरुष गटात १० संघ तर महिला गटात ०८ संघानी सहभाग घेतला. सदर स्पर्धेत पुरुष गटात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पी.जी व यु.जी. संघ विजेता ठरला. तर महिला गटात सुद्धा पी.जी व यु.जी. क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघ विजेता ठरला. उपविजेता पी.ओ नहाटा महाविद्यालय भुसावल तर तृतीय क्रमांक एम.जे .कॉलेज जळगाव. महिला गटात पी.जी व यु.जी. क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघ विजेता ठरला. व उपविजेता के.सी.ए.आय.एम.आर महाविद्यालय जळगाव व तृतीय क्रमांक गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज जळगाव. सदर स्पर्धेचे उद्घाटन ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.भागवत विश्वनाथ पाटील , उपाध्यक्ष श्री.आर.एन.महाजन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी केले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील उपस्थित होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप तायडे तर प्रास्ताविक क्रिडा संचालक डॉ.सचिन झोपे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी स्थानिक क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.आर.व्ही.भोळे, प्रा.डॉ.पी.आर.गवळी,प्रा.सुनिल इंगळे,प्रा.डॉ.के.जी.कोल्हे, प्रा. साईनाथ उमरीवाड, प्रा.डॉ.संदीप साळुंके , प्रा.डॉ.रेखा पाटील, श्री.गोपाल महाजन शिक्षकेतर कर्मचारी श्रेयस पाटील, जयेश पाटील, सौरभ पाटील, हर्षल पाटील व भास्कर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
(संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर