निळे निशाण सामाजिक संघटनेचे विविध समस्यां बाबत यावल पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


  दि .०७/१०/२०२२ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने अनु . जाती / जमातीच्या लोकांच्या समस्याचे निवेदन देण्यात आले.

  अनु . जाती / जमातीच्या नागरिकांच्या प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागणे बाबत तसेच अनु . जमातीच्या मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवणार्‍या शिक्षक व अंगणवाडी सेविकेवर तात्काळ कारवाई होणे बाबत म.गटविकास अधिकारी यावल यांना निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 

यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये अनु . जाती / जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून आजही ते पुर्णपणे शासनाकडून मिळत असलेल्या सुख - सुविधे पासून तसेच जिवनावश्यक मुलभूत गरजांन पासून वंचित आहे . याचे लेखी स्वरूपात निवेदन आम्ही वारंवार देऊन सुद्धा आमच्या समस्यांचे समाधानकारक निवारण झालेले नाही तरी आमच्या समस्यांकडे आपले लक्ष वेधण्याकरिता आज दि.०७/१०/२०२२ रोजी लोकशाही मार्गाने आम्ही आपल्या कार्यालया समोर आंदोलन करत आहोत तरी आमच्या प्रलंबीत मागण्या पुढील प्रमाणे[ads id="ads2"] 

१) चारमळी येथे पिण्यांचे पाणी व्यवस्था , गावाअंतर्गत रस्ते , गावात लाईटाची व्यवस्था , शाळा सुरळीत चालू असणे , अंगणवाडी चारमळी येथे पाहिजे , चारमळी येथिल आदिवासी मुलाना एक वर्ष शिक्षणापासुन वंचित ठेवणाऱ्या शिक्षकावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे तसेच अतिरिक्त कारभार असणाऱ्या अंगणवाडी सेविकेची कारभार असल्यापासुन चौकशी करून अहवालाची प्रत आम्हाला दयावी .

हेही वाचा :- Tractor Subsidy Scheme : ट्रॅक्टर साठी मिळणार शासनाच्या "या" योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान  ; असा करा अर्ज

२) टेंभीकुरण येथे रस्त्याचे काम तात्काळ करणे .

३) आसराबारीपाडा येथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे , आसराबारीपाडा वर्ड्री खु ॥ ग्राम पंचायतीत समाविष्ट करणे , आसराबारीपाडा येथे अंगणवाडी उभारण्यात यावी.

४) धुळेपाडा हे सांगवी बु ॥ ग्राम पंचायतीत समाविष्ट करणे , धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी , धुळेपाडा येथे रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे .

५) सांगवी बु ॥ येथील भिल्ल समाजाकरिता दफनभुमीची समस्या तात्काळ मार्गी लावावी , अतिक्रमित घरे नमुना नंबर ८ ला लावावित.

  अनु . जाती / जमातीवर होत असलेला अन्याय पाहता त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता आम्हाला संर्घष करण्याची वेळ येईल अशी परिस्थिती येऊ नये असे आम्ही निवेदनात नमुद केलेले असताना सुद्धा आपण जाणिवपुर्वक अनु जाती / जमातीच्या लोकांन बद्दल द्वेषबुद्धीने अन्याय करित आहात तरी येत्या पंधरा दिवसात आमच्या समस्या न सुटल्यास यावल येथील भुसावळ चौफुलीवर रास्ता रोको करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

  तसेच आंदोलना दरम्यान काहीएक अनुचित प्रकार घडल्या सर्वस्वी आपण जवाबदार रहाल असे निवेदन सादर करण्यात आले तेव्हा यावल पंचायत समिति गट विकास अधिकारी यांनि आंदोलन मागे घेण्या करिता येत्या ४ दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि १५ दिवसात निवेदणात नमुद असलेल्या समस्या सोडविण्याचे लेखी पत्र दिले तेव्हा संघटनेचे शुरू आंदोलन मागे घेण्यात आले.

त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , महिला मंच जिल्हा प्रमुख नंदाताई बाविस्कर , रोजगार मंच जिल्हा प्रमुख युवराज सोनवणे , जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , महिला मंच तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे , महिला मंच तालुका उपाध्यक्षा ज्योतीताई कुरकुरे , ता . उपाध्यक्ष सैय्यद सखावत , ता . युवक संपर्क प्रमुख दिपक मेढे , ता . सल्लागार राहुल तायडे , जितेंद्र मेढे , सिकाऱ्या पावरा , मिलिंद सोनवणे , सुनिल बारेला , देविदास बारेला , दिपक मेढे , नितिन कोलते व असंख्य महिला - पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!