नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) शहरात खाजगी तत्वावर काम करणाऱ्या वाटर ग्रेस सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन पहायला मिळालय. ठेकेदाराकडून कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांकडून मुंबई नाका पोलीस स्टेशन जवळ आंदोलन करण्यात आले. [ads id="ads1"]
नाशिक शहरात वॉटर ग्रेस खाजगी कंपनीच्या माध्यमातून नाशिक शहरात स्वच्छता करण्यात येते. कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने जवळपास सातशे कर्मचारी संपावर आहेत.[ads id="ads2"]
या कंत्राट मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. दरम्यान संतप्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी थेट आरोप केले आहेत. कंत्राटदाराविरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी तक्रार दाखल केली आहे.
मुंबई नाका पोलीस स्टेशन परिसरात बराच काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.