यावल-विरावली रस्त्यावर ॲपे रिक्षाच्या अपघातात एक ठार ; दोन जण जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल-विरावली रस्त्यावर ॲपे रिक्षाचा अपघातात एक ठार ; दोन जण जखमी


यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)

यावल तालुक्यातील वीरावली ते यावल रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्य सुमारास विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी एम एच १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षा ने प्रवास करित असताना विरावलि ते यावल दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ऑटो रिक्षा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडून पलटी होऊन जखमींना उपचारासाठी यावल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.[ads id="ads1"] 

  मात्र सेवानिवृत्त शिक्षण विभाग अधीक्षक दस्तगीर सबाज तडवी राहणार विरवली ह मु जळगाव यांना जबर मार लागल्याने त्यांना जळगाव येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल कारीत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.[ads id="ads2"] 

   मात्र सदर गुन्ह्याची ऑटो रिक्षा जागेवरून पसार झाल्याने मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून मृत्यू संदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे सदर प्रकरणी चौकशी होऊन औटो रिक्षा मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे, हिंगोली जिल्हा RTO आशिफ तडवी यांचे ते वडिल आहेत.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा

हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!