रावेर शहरातील जीआयएस कॉलनी भागातील घरफोडी : 58 हजारांचा ऐवज लंपास ;रावेर पोलिसात गुन्ह्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर  शहरातील  जीआयएस कॉलनी (GIS Colony,Raver) भागातील तडवी कॉलनीत बंद घरातून चोरट्यांनी 58 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"] 

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

तक्रारदार शाम दिनकर तायडे (35) हे व्यापारी असून रावेर शहरातली तडवी कॉलनीत ते वास्तव्याला आहेत.[ads id="ads2"] 

   8 ते 9 ऑक्टोंबर च्या दरम्यान ते बाहेरगावी गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील 50 हजारांची रोकड, पाच हजार रुपये किंमतीचा रेड मी मोबाईल (Mi Red Mi Mobile) , तीन हजार रुपये किंमतीचे व दोन ग्रॅम वजनाचे टॉप्स मिळून एकूण 58 हजारांचा ऐवज लांबवला.

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- 👉रावेर नगरपालिकेवर कर आकारणी विरुद्ध शहराातील लोकांचा धडकला मोर्चा

हेही वाचा :- 👉रावेर तालुक्यातील निंभोरेसिम येथे लंपी आजाराने बैलाचा मृत्यू 

 शाम तायडे यांनी या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहेत.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!