शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी सोसायटी ; लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्या आधी विड्रॉल पावतीवर शेतकऱ्यांची स्वाक्षरी : लाच लुचपत विभागासह जिल्हा बँकेला फार मोठे आव्हान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 यावल (सुरेश पाटील)

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले कर्ज मुक्ती योजने अंतर्गत जळगाव जिल्हा बँकेतर्फे जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रोत्साहन पर लाभ योजने मध्ये पात्र शेतकरी सभासदांना मिळणाऱ्या पन्नास हजार रुपये अनुदानापैकी 25 हजार रुपयाची विड्रॉल पावती भरून घेत असल्याचा नवीन प्रथा यावल तालुक्यात काही ठराविक विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून संबंधित सचिव/ सेक्रेटरी/चेअरमन/ संचालकांनी संगणमताने सुरू केल्याने 50 हजार रुपयापैकी पंचवीस हजार रुपये लाच खाण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने यावल तालुक्यातील हे प्रकरण जळगाव जिल्हा बँकेसह लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांना फार मोठे आव्हान ठरणार आहे.[ads id="ads1"] 

  काही विकासोसायटीच्या काही पात्र शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सहाय्यक निबंधक आणि संबंधित काही जिल्हा बँक संचालकांकडे लेखी तोंडी तक्रारी केल्याचे बोलले जात असून याबाबत जिल्हा बँक जळगाव आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक तक्रारीनुसार काय कार्यवाही करतील किंवा नाही याकडे संपूर्ण यावल तालुक्यातील सहकार क्षेत्र,राजकारण, सामाजिक संघटनांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads2"] 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यात सर्वाधिक जास्त आर्थिक उत्पन्न असलेल्या यावल तालुक्यातील एका ग्रामपंचायत क्षेत्रातील एका विकासोसायटीने जिल्हा बँकेतर्फे पात्र शेतकरी सभासदांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्या कामी शेतकऱ्यांची यादी निश्चित केली आहे.आणि या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये लवकरच जमा होणार असल्याने एका विका सोसायटीचे सचिवाने शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून बोलावून तुमच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करून घ्यायचे असल्यास आधी तुम्ही पंचवीस हजार रुपयाची विड्रॉल पावतीवर स्वाक्षरी करून माझ्याकडे द्या नाही दिल्यास तुम्हाला अनुदान मिळणार नाही अशी शुद्ध दिशाभूल करून शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाण्याचा नवीन प्रकार, प्रथा खुद्द एका विकास सोसायटी मार्फत सुरू झाल्याने 

हेही वाचा :- आपल्या कडे पिवळे कार्ड आहे तर मग ही बातमी तुमच्या कामाची आहे  दारिद्रयरेषेखालील कुटुंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत मिळणार चार एकर कोरडवाहू व दोन एकर बागायती शेतजमीन

हेही वाचा :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- आपल्याकडे असलेला बंद किंवा तुटलेल्या फोनवरही मिळणार आता 2000 रुपये..! ‘जिओ’ची भन्नाट ऑफर

हेही वाचा :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे गावातील 23 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या 

👇इथे क्लिक करून तपासा 👇

 (संपूर्ण भारतातील P M Kisan Sanman Nishi यादी पाहा - गावानुसार)

याबाबत म्हणजे पूर्व भागात विद्यमान आमदार,माजी आमदार,खासदार यांच्या घरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील एका विकासोच्या कार्यक्षेत्रात म्हणजे भालोद,बामणोद.हिंगोणा,हंबर्डी. सांगवी,डोंगर कठोरा परिसरात शेतकरी वर्गात व राजकारणात जोरदार चर्चा सुरू असल्याने याबाबत जळगाव जिल्हा बँक आणि जिल्हा बँकेचे संचालक तसेच आमदार खासदार संबंधित सोसायटीच्या सचिव सेक्रेटरी चेअरमन संचालक यांच्यावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून असल्याचे तसेच ही नवीन लाच खाण्याची प्रथा जिल्हा बँकेसह लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांना फार मोठे आव्हान ठरणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!