रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे शासनाकडून प्राप्त आनंदाचा शिधा कीटचे वाटपास आजपासून सुरुवात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे शासनाकडून प्राप्त आनंदाचा शिधा कीटचे वाटपास आजपासून सुरुवात

तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी (राजेश वसंत रायमळे)

          याबाबत सविस्तर वृत्त असे की,सार्वजानीक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहाराष्ट्र शासनाकडून 'आनंदाचा शिधा हे शिधा जीन्नसांचे कीट तामसवाडी ता.रावेर येथील स्वत धान्य दुकानात उपलब्ध झालेले असून या कीटचे मुल्य शंभर रूपये असून सदरच्या शंभर रूपयांत लाभार्थ्यांना एक कीलो हरभरा डाळ, एक कीलो रवा,एक कीलो साखर आणि एक लिटर गोडेतेल अशा या चार वस्तूंचा लाभ मिळणार असून[ads id="ads1"]  स्वत धान्य दुकानदार तामसवाडी ता.रावेर यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अद्याप साखर प्राप्त झालेली नाही तरी उर्वरित वर नमूद तीन जिन्नसांचे वाटप सूरू असून साखर प्राप्त झाल्यानंतर लगेचच साखरेचे वितरण सूरू करण्यात येईल अशी माहिती स्वत धान्य दुकानदार यांचेकडून प्राप्त झाली.[ads id="ads2"] 

दरम्यान आनंदाचा शिधा कीट वाटप सुरूवात करते समयी स्वत धान्य दुकानदार शरद प्रभाकर चौधरी यांच्यासह सुलक्षणा राजेश रायमळे,पोलीस पाटील तामसवाडी ता.रावेर पत्रकार राजेश वसंत रायमळे आणि मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!