नांदगाव जि.नाशिक(मुक्ताराम बागुल) - दिनांक 13 ऑक्टोबर रोजी गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवडे गट) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम साहेब नाशिक यांची भेट घेऊन पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या विषयाचे निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
सदरच्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहराचा पेस्ट कंट्रोलचा ठेका अनेक वर्षापासून एकाच संस्थेला दिला आहे. तसेच टेंडर प्रक्रिया न करता अडीच वर्षापासून सदर संस्थेची मुदत संपवूनही ठेका वाढवून देण्यात येत आहे. [ads id="ads2"]
एवढे वर्ष ठेका चालू असूनही मच्छर कमी झालेले नाहीत. तसेच डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया आधी साथीचे रुग्ण वाढत आहेत. व त्यात अनेक शेरवाशांचे प्राण जात असून सदर ठेकेदारावर त्वरित मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून ठेकेदाराला टाकावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू असा इशारा महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.