ऐनपुर प्रतिनिधी(विनोद कोळी) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यार्थी विकास विभाग आणि ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या विषयावर प्रा.डॉ.एल.ए.पाटील (माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय,अमळनेर) यांच्या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. [ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून व्याख्यान आयोजनाची भूमिका व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयात होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या विषयावरील व्याख्यानात प्रा.डॉ.एल.ए पाटील यांनी भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून तर ब्रिटिशांनी भारतात सत्ता कशी मजबूत केली, १८५७ चा उठाव , ब्रिटिशांनी भारतात केलेले विविध कायदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली यावरही प्रकाश टाकला. [ads id="ads2"]
संविधानाची उद्दिष्ट पत्रिका समजुन सांगितली, प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधान माहित असणे गरजेचे आहे. संविधानच आपला धर्म आहे. संविधानच गीता आणि कुराण आहे. संविधानामुळेच आपण मोकळा श्वास घेत आहोत . संविधानामुळेच भारत देश एकसंघ आहे. यासाठी सर्व भारतीयांना संविधान समजून घेणे गरजेचे आहे. आजची युवा पिढी उद्याचा भारत देश घडविणार आहे. यासाठी तरुणांनी संस्कारक्षम होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य सहज मिळाले नाही स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्यांची स्मृती जपणे, त्यांच्यापासून प्रेरणा घेणे आपले कर्तव्य आहे.असे विचार त्यांनी मांडले.तसेच त्यांनी आपले स्वलिखित सुसंस्कृत व्यक्तीमत्व हे पुस्तक महाविद्यालयास भेट दिले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन
अध्यक्षीय भाषणात श्री. आर.एन महाजन सरांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाविद्यालयात होत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन श्री.श्रीराम पाटील ,सचिव श्री.संजय पाटील, संचालक कैलास पाटील,पी आर चौधरी, डॉ सतिश पाटील, रविन्द्र पाटील,पी एम पाटील,आर एस पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी असे एकुण २४५ श्रोते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.के.जी. कोल्हे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. एस. ए. पाटील व आभार प्रा. डॉ.व्ही.एन. रामटेके यांनी मानले.