यावल वन क्षेत्रातील यावल वन अधिकारी यांच्या ताब्यातील 3 आरोपी फरार ; यावल वन विभागात मोठी खळबळ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील) यावल पूर्व वन क्षेत्रातील अतिक्रमण प्रकरणात अटक केलेले 3 आरोपी काल दि.12 यावल पूर्व वनविभाग अधिकारी कर्मचारी यांच्या ताब्यातून फरार झाल्याची खळबळ घटना घडल्याने यावल वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची झोप उडाली या अति महत्त्वाच्या प्रकरणात यावल वन विभाग उपवनसंरक्षक विवेक होसिंग, सहाय्यक वन संरक्षक हडपे संबंधितांवर काय कारवाई करतात? याकडे संपूर्ण वन विभाग पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"] 

         यावल पूर्व वन क्षेत्रात एका गुन्ह्यात वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आहे या गुन्ह्यातील आरोपींची तारीख भुसावल न्यायालयात असल्याने कस्टडीत असलेले 1)प्यारासिंग पावरा,2)सुरेश पावरा,3)बिलालसिंग हे तीन आरोपी काल दि.12 रोजी वन विभाग यावल पूर्व यांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान यावल पोलीस कस्टडीत ठेवण्याची पूर्तता करताना 3 आरोपी फरार झाले. [ads id="ads2"] 

  या वृत्ताची माहिती घेण्यासाठी यावल पूर्व वन क्षेत्र पाल विक्रम पदमोर यांच्याशी आज सकाळी मोबाईल वरून चार-पाच वेळा संपर्क साधला असता नो रिप्लाय झाला त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक हडपे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता तीन आरोपी फरार झाल्याच्या घटनेस त्यांनी दूजोरा दिला,आणि सविस्तर माहिती घेऊन नंतर कळवितो असे सांगितले.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

         यावल पूर्व वन क्षेत्रातील तीन आरोपी फरार झाल्याने यावल वन विभागाच्या संपूर्ण कारभाराबाबत तसेच सहाय्यक वन संरक्षक हडपे यांच्या शासकीय कार्यक्षेत्रातील संपूर्ण यावल वन विभागातील वन क्षेत्रातील सागवानी वृक्षतोड व अवैध वाहतूक तसेच वन जमिनीवरील अतिक्रमणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

       याबाबत यावल पोलीस ठाणे अंमलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता वन विभागातील आरोपी फरार झाल्याची तक्रार किंवा नोंद आहे का विचारले असता त्यांनी काहीही नोंद नसल्याचे सांगितले.

        यावल ग्रामीण रुग्णालयातून काल संध्याकाळी आरोपींची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपी फरार झाले कसे याबाबत यावल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरती संशय व्यक्त केला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!