रावेर तालुक्यातील चिनावल येथे ड्रोनद्वारे गावठाण भागाचा सर्व्हे ; प्रत्येकाला मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड मिळणे होणार शक्य

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास, भूमी अभिलेख व भारतीय सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने केंद्राच्या स्वामित्व योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व गावांच्या गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापन (सर्वेक्षण) केले जाणार आहे. त्यानुसार चिनावल ता. रावेर जिल्हा जळगाव (Chinawal Taluka Raver Dist Jalgaon) येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले.[ads id="ads1"] 

ड्रोनद्वारे गावठाण जमिनीचे मोजमाप करणे केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्याद्वारे प्रत्येक गावातील गावठाणाची मोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक गावात ड्रोन फ्लाय करण्यापूर्वी भूकरमापक व ग्रामसेवकाच्या उपस्थितीत प्रत्येक घराचे मिळकतीचे, ग्रामपंचायत मिळकत, सरकारी जागा, रस्ते,नाले यांचे चुना टाकून सीमांकन करण्यात येईल. गावठाण मोजणी झाल्यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांना त्याचा लाभ होईल. या सर्वेक्षणामुळे ग्रामपंचायतीच्या गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख पत्र तयार करता येईल. [ads id="ads2"] 

  ग्रामपंचायतीला कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख नकाशा उपलब्ध होईल. ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होईल. नमुना क्रमांक ८ नोंदवही आपोआप तयार होईल. गावठाणातील ग्रामपंचायत, शासन व सार्वजनिक मिळकती जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित होईल.

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना

हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)

 रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर🌾 यांना मिळणार 3 महिने मोफत राशन 

 त्यामुळे गावातील वाद कमी होतील. यावेळी पी.एम. गिरी, जी.एम. पटवारी, जी.बी. वाघ, एस. एन. तडवी, अनिल तडवी व केंद्राच्या ड्रोन टीमचे आर. के. दास, सहाय्यक राहुल सरदार व शरद शिंदे उपस्थित होते.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहन पर योजना म्हणजेच ५० हजार रुपये प्रोत्साहन पर योजनेची जळगाव जिल्ह्याची पात्र यादी (गावानुसार) पहा

यापूर्वी ज्या गावाची लोकसंख्या दोन हजारांच्या वर आहे, तेथेच सर्वेक्षण केले जात होते. आता केंद्राच्या स्वामित्व योजनेद्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी होत आहे. याद्वारे प्रत्येकाला त्याच्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड मिळेल. या कार्डनुसार मिळकतीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, कर निश्चिती व इतर सर्व लाभ मिळकत धारकांना देता येतील. -पी.एम. गिरी, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, रावेर

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!