नांदगाव डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर अतुल नावंदर यांची एकमताने निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

नांदगाव डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर अतुल नावंदर यांची एकमताने निवड

नांदगाव तालुका प्रतिनिधी(मुक्ताराम बागुल)

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे डॉक्टर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यात नांदगाव शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर, संचालक उपस्थित होते. दरवर्षी दिला जाणारा धन्वंतरी पुरस्कार यावेळी डॉक्टर यशवंत गायकवाड तसेच डॉक्टर विद्याताई राठोड यांना देण्यात आला. यानंतर नांदगाव डॉक्टर असोसिएनचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर अतुल नावंदर यांची एकमताने निवड करण्यात आली.[ads id="ads1"] 

      तसेच नवीन सेक्रेटरी म्हणून डॉक्टर राहुल नाईक व खजिनदार म्हणून डॉक्टर उदय मेघा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. डॉक्टर सुनील तुषार यांनी नवीन कार्यकारणीचे स्वागत केले. नांदगाव डॉक्टर असोसिएशनचे नवीन अध्यक्ष डॉक्टर नावंदर यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर अत्रे यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. [ads id="ads2"] 

  गेल्या कित्येक वर्षाची अडकलेली कामे मार्गी लावण्याचे व भविष्यात ठोस उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉक्टर नावंदर यांनी केले.

👉 हेही वाचा :- Jalgaon : मुक्ताईनगर तालुक्यात १७ लाखांच्या गुटख्यासह वाहन जप्त ; विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाची कारवाई 

👉 हेही वाचा :- विद्यापीठाचे पदवी प्रदान समारंभ होणार बंद - आता विद्यार्थ्यांना मिळणार 'अशी' पदवी 

👉 हेही वाचा :-   दिवाळी, भाऊबीज शुभेच्छा,वाढदिवस बॅनर आणि सर्व प्रकारचे बॅनर बनवा अगदी काही मिनिटात तेही तुमच्याच मोबाइल वरून तेही अगदी मोफत


     गेल्या बारा वर्षात नांदगाव तालुक्यात वैद्यकीय सेवा पुरवत असताना डॉक्टर असोसिएशन साठी देखील झटणाऱ्या डॉक्टर अमोल नावंदर यांचा उचित सन्मान करण्यात आला. यावेळी नांदगाव शहर व नांदगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!