स्वतः धान्य दुकादारांना झाली डोके दुखी
यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
सरकारने मोठ्या जल्लोषात गरिबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता 100 रुपयात रेशन दुकान वरती आनंदाचा शिधा वाटप करण्यात सुरुवात केली होती. यामधे 1 किलो तेल, 1 किलो साखर, 1 किलो डाळ आणि 1 किलो रवा असे वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते. [ads id="ads1"]
परंतु सरकारची हो योजना फसली असल्याचे दिसून येत आहे. कारण बऱ्याच रेशन दुकान वरती साखर गायब झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने गरिबांची थट्टा केल्याची चर्चा जनसामान्य लोकांमध्ये दिसून येत आहे.याबाबत सरकारने साखर दिली नसल्याचे अनेक रेशन दुकानदार खाजगीत बोलत असल्याचे दिसून येत आहे.[ads id="ads2"]
त्यामुळे नेमके योजनेचे गौडबंगाल आहे तरी काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. काही रेशन दुकान वरती साखर मिळाली तरी काही ठिकाणी साखर वाटप होत नसल्याचे दिसून येत आहे.रेशन पुरवठा अधिकारी यांनी याबाबत ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा द्यवा अशी चर्चा लाभार्थी रेशन धारक करीत आहेत.