कोल्हापूरचे डॉ देवेंद्र रासकर महाराष्ट्र समाजरत्न पुरस्काराने सन्मानित...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


कोल्हापूर:- दि 29 ऑक्टोबर रोजी, अखिल भारतीय कला, क्रीडा, सांस्कृतिक अकादमी ठाणे यांच्यावतीने, डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आयोजित गौरव संमेलनामध्ये, सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे यांच्या शुभहस्ते, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते *मा. डॉ. देवेंद्र रासकर सर* यांना या वर्षीचा "महाराष्ट्र समाजरत्न गौरव पुरस्कार व कार्यभूषण सन्मानपत्र" लोकमान्य फेटा, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. [ads id="ads1"] 

डॉ रासकर यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, थुंकिमक्त चळवळ तसेच अपंग, दुर्गम क्षेत्रांत आपल्या गुणवत्तेनुसार विविध अंगी समाज कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. [ads id="ads2"] 

  आपल्या कार्यकर्तुत्वाने प्रगल्भ समाज निर्मिती करून कृतिशील गुणवत्ता समाजासमोर ठेवणाऱ्या व समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या, तसेच इतरांसाठी दीपस्तंभ असणाऱ्या व्यक्तींचा या संमेलनामध्ये गौरव करण्यात आला. डॉ रासकर सर आपले कार्य उत्तरोत्तर बहरत जावो ही मनोकामना. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन...

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!