चोपडा शहरात हळहळ
कार्यालयाचा कामासाठी आपल्या कार्यक्षेत्रावरून काम आपटून कृषि पर्यवेक्षक मनोहर फकिरा पाटील हे आपल्या मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 19 बी आय 0154) ने चोपड्याकडे येत असताना गूळ नदीचा पूल पार करून हॉटेलं दाजीबा जवळ मजूर भरलेली (नंबर एम.एच.19 सी.डबल्यु 9275) मागून येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक देऊन तीस ते चाळीस फूट फरफटत नेले यात मनोहर फकिरा पाटील यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने व ते ट्रकच्या बंपर मध्ये अडकले होते. ट्रक ड्रायव्हरने तरीही आपल्या हातातील ट्रक तशीच पुढे नेण्याचे प्रयत्न केला परंतु मोटारसायकल व मनोहर पाटील हे स्वतः अडकल्याने ट्रक काही अंतरावर जाऊन थांबली.[ads id="ads2"]
अपघातानंतर ट्रक चालक पसार
ट्रक ड्रायव्हर हा अपघाताची स्थिती पाहिल्या नंतर तेथून पसार झाला. परंतु मनोहर पाटील हे त्याचजागी ठार झाले. मनोहर पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी ही वार्ता गावात कळताच शहरातील त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, परिसरातील मंडळीनी गर्दी केली. त्यांच्या पश्चात धर्मपत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


