रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) दि. २१/११/२०२२, वार ,सोमवारी या दिवशी दि फिनिक्स फौंडेशन इंडिया या सामाजिक संस्थे मार्फत स्वच्छ भारत मिशन आणि पर्यावरण संवर्धन या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण रुग्णालय रावेर जिल्हा जळगाव या परिसरात स्वच्छता मोहीम आणि वृक्ष रोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय रावेर येथील रुग्णालय परिसरात आधी सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.[ads id="ads2"]
नंतर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे यांचे मार्गदर्शन लाभले. रुग्णालयाचे कर्मचारी प्रशांत जंगले सर,परिसेविका रीता धांडे,सुनील चौधरी,संजय जंगले,किशोर झोपे, असिब तडवी,सलीम तडवी,महेंद्र सुरवाडे,रवींद्र महाजन, मोहिनी भारंबे, सुवर्णा इंगळे,अर्चना पाटील,पुनम चौधरी,विजय बारी, पवण पाली,नितीन सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य आणि परिश्रम घेतले.
हेही बातमी वाचा:- बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्या नंतर आ.एकनाथराव खडसे काय म्हणाले ?
हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
दि फिनिक्स फौंडेशन इंडिया या संस्थेचे अध्यक्ष मा.सचिन जी अवसरमल यांचा मार्गदर्शना खाली व संस्थेचे सचिव मा. मेघराज जी शेगावकर यांचा प्रयत्नाने कार्यक्रमाची सांगता केली.


