रावेर तालुका -प्रतिनिधी विनोद कोळी
दिनांक 21 /11/ 2022 या दिवशी अचानक, रावेर येथे पासेस काढणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे गैरसोय होत आहे; ही बाब लक्षात येताच" प्रहार दिव्यांग क्रांती संघटना" तालुका अध्यक्ष विनोद कोळी आणि त्यांचे पदाधिकारी ,यांनी अचानक बस डेपो मध्ये धाव घेतली असता, प्रथम तेथे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी ,आणि विद्यार्थिनी ,यांचा एकच गोंधळ दिसून आला. [ads id="ads1"]
त्यावेळेस दुपारचे 2 वाजून 20 मिनिटे झालेले होते. तरीपण पासेस काढणारा (क्लर्क) तिथे आलेला नव्हता; बस डेपो मधल्या (आगार प्रमुखाला) आम्ही वेळेची विचारणा केली असता ,पासेस काढणारा अडीच वाजता येतो असे त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले .आणि फलक बोर्डावर पासेस, काढण्याचा वेळ दोन ते चार असा आहे.[ads id="ads2"]
अशा प्रकारची वेळेची फसवणूक शाळकरी विद्यार्थ्यांची लगभग सहा महिन्यापासून होत आहे .तसेच पासेस काढण्या ठिकाणी स्पेशल मुलांची आणि स्पेशल मुलींची दोन खिडक्या असून सुद्धा (आगारप्रमुखांनी) एकच खिडकी चालू ठेवली आहे. त्यामुळे मुलींना, मुलांच्या रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे खूप भयानक हालआपिष्टा ,सहा महिन्यापासून ते आजपर्यंत सहन कराव्या लागत आहेत ;त्यात बरेचशा विद्यार्थिनी ,पासेस बिना वापस जात आहेत. याला जबाबदार आगार प्रमुख की प्रशासन? म्हणून लवकरात लवकर, विद्यार्थिनींसाठी सुद्धा दुसरी खिडकी चालू करण्यात यावी ,दोघं खिडकी योजना चालू न केल्यास (प्रहार दिव्यांग संघटना क्रांतीतर्फे )मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल त्या ठिकाणी उपस्थित प्रहार दिव्यांग संघटना क्रांती तालुकाध्यक्ष ,विनोद कोळी. दिव्यांग उपाध्यक्ष ,शशिकांत पाटील. दिव्यांग उपाध्यक्ष, जितेंद्र कोळी .तालुका संघटक आनंदा कोळी. तालुका कार्याध्यक्ष, दिनेश सैमिरे. इत्यादी प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.