रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद कोळी
जळगाव जिल्ह्यातील, मुक्ताईनगर (उपजिल्हा रुग्णालय) यापूर्वी शंभर घाटांचे होते .मात्र आमदारांच्या पाठपुराव्याने आता 100 खटांच्या रुग्णालयास मान्यता मिळाल्याने, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.[ads id="ads1"]
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गेल्या दोन वर्षापासून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता .त्यानुसार मागील काळात रुग्णालयाला शंभर घाटांचे श्रेणी वर्धनाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होती .त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील ,यांच्या सततच्या पाठपुराव्याने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे शंभर घाटांच्या रुग्णालयाच्या अंदाजपत्रक ,व नकाशे शासनाकडे निधी मागणीसाठी प्रस्तावित होते. [ads id="ads2"]
यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केल्याने शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी, मुक्ताईनगर ,उपजिल्हा रुग्णालयाला शंभर खटांच्या रुग्णालय मुख्य इमारत, व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय, क्रमांक प्ररामा 2022/प्र.क्र.144/ आरोग्य 3 मुंबई 400001 दि.18 नोव्हेंबर 2022 अन्वये रुग्णालय मुख्य इमारतीसाठी1355.05 लक्ष इतक्या मोठ्या भरीव निधीसह अंदाजपत्रक व नकाशांना मंजुरी मिळाली आहे. आमदार चंद्रकांत पाटील ,यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून ,मतदारसंघातील गोरगरीब जनता तसेच, अपघातग्रस्त रुग्णांना ,मोठा दिलासा या निर्णयामुळे मिळाला आहे. मुक्ताईनगर मतदारसंघाने आरोग्याच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकल्याने या निर्णयाचे सर्वस्व कौतुक होत आहे.