रावेरच्या छोरीया मार्केटमधून ढेपेच्या पोत्यांनी भरलेली आयशर लांबवली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर शहरातील छोरीया मार्केटसमोरून (Choriya Market Raver) ढेपेच्या सात टन वजनांनी भरलेली पाच लाख रुपये किंमतीची आयशर गाडी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात (Raver Police Station) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.[ads id="ads1"] 

चोरट्यांनी मध्यरात्री साधली संधी

31 ऑक्टोंबरच्या रात्री नऊ ते 1 नोव्हेंबरच्या सकाळी आठ दरम्यान रावेर-बऱ्हाणपूर (Raver -Burhanpur) रस्त्यावरील छोरीया मार्केटसमोरून चोरट्यांनी ढेपेचे सात टनांनी भरलेली आयशर (MH 04 GC 6915) लांबवली. [ads id="ads2"] 

  बालाजी ॲग्रो इण्डस्ट्री, दयापूर (Balaji Agro Industries) येथून या वाहनात सात टप ढेप भरण्यात आली होती.

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर 

हेही वाचा :- कुशीनगर एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे असलेल्या बर्‍हाणपूरच्या युवकाचा रेल्वे मधून खाली पडल्याने मृत्यू ; सावदा रेल्वे स्थानकाजवळील घटना

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- सावदा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षक जळगाव एसीबीच्या जाळ्यात

 मात्र मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी फिरोज खान रज्जाक खान (54, अफू गल्ली, रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिसात (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!