
रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. २९ जानेवारीला १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. समितीचे एकूण दोन हजार ६५० मतदार आहेत, अशी माहिती समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी दिली.[ads id="ads1"]
या संदर्भात आज जिल्हा निबंधकांनी मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. या यादीवर १४ ते २३ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप व हरकती नोंदवता येतील. आलेल्या आक्षेप, हरकतींवर २ डिसेंबरला निर्णय होईल. ७ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल.[ads id="ads2"]
२३ ते २० डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करणे, ३० डिसेंबरला अर्जाची छाननी, २ जानेवारीला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध, १६ जानेवारी अर्ज माघार, १७ जानेवारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध, २९ जानेवारीला मतदान व ३० जानेवारीला मतदान होईल. बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघात ९५ ग्रामपंचायती असून त्यांचे ८९८ मतदार आहेत. याशिवाय विकास सोसायटी मतदारसंघात ६२ विकास सोसायटींचे ४७६ मतदार, व्यापारी मतदार संघात ७६३ व हमाल मापाडी मतदार संघात २३३ असे एकूण २ हजार ६५० मतदार आहेत. दरम्यान, या निवडणुकीसाठी इच्छूकांच्या हालचाली गतीमान झाल्याचे दिसून येत आहे.

