ऐनपूर महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 ऐनपूर (विनोद कोळी) :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथील मराठी विभाग,हिंदी विभाग,इंग्रजी विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"] 

   या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी व  इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये निबंध सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मागितले होते. या निबंध स्पर्धे मध्ये मराठी भाषेतील ५३ निबंध प्राप्त झाले होते, हिंदी भाषेमधील १२ निबंध प्राप्त झाले होते. इंग्रजी भाषेमधील २३ निबंध प्राप्त झाले होते.  असे एकूण ८८ निबंध जळगाव,  धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून प्राप्त झाले होते. मराठी भाषेमधील निबंधाचे परीक्षण मराठी विभाग प्रमुख डॉ. रेखा पी पाटील व प्रा महेन्द्र सोनवणे यांनी केले. [ads id="ads2"] 

  हिंदी भाषेतील निबंधाचे परीक्षण हिंदी विभाग प्रमुख डॉ. पी आर गवळी यांनी केले. इंग्रजी भाषेतील निबंधाचे परीक्षण इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. नरेंद्र मुळे यांनी केले. या सर्व निबंधांपैकी मराठी भाषेच्या निबंधामधून  प्रथम क्रमांक पूजा नरेंद्र आके  महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चोपडा व  माधुरी सुनील पाटील जी डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव यांना विभागून देण्यात आला. तर द्वितीय क्रमांक   प्रदुम्न गोपाल वारडे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर व रोहिणी जगन्नाथ सैंदाणे विद्या वर्धिनी महाविद्यालय धुळे यांना विभागून देण्यात आले. तर तृतीय क्रमांक अल्ताफ युसुफ पटेल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर याने पटकावला. 

हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम 

हिंदी भाषेतील निबंधांमधून  प्रथम क्रमांक लीना जितेंद्र सोनवणे जी.डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव हिने पटकाविला द्वितीय क्रमांक मुस्कान युसुफ पटेल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर याने मिलविला तर तृतीय क्रमांक सुंदराणी  कशिश राजकुमार, एस. एस. व्ही. पी. एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धुळे हिने पटकाविला तर  इंग्रजी भाषेच्या निबंधांमधून  प्रथम क्रमांक अल्ताफ युसुफ पटेल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर याने पटकाविला. द्वितीय क्रमांक आचल बबन बढे, जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव. याने पटकाविला तर तृतीय क्रमांक शिवली संजय कुमावत कला आणि वाणिज्य गरुड महाविद्यालय शेंदुर्णी हिने पटकाविला.   प्रा. डॉ. के.जी. कोल्हे , प्रा. महेंद्र सोनवणे ,डॉ. व्ही.एन.रामटेके,  प्रा. डॉ. रेखा पी. पाटील प्रा. डॉ. पी. आर. गवळी  प्रा. नरेंद्र मुळे यांनी  प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.



#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!