रावेर तालुका प्रतिनीधी (विनोद हरी कोळी) रावेर तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून (परिविक्षाधीन तहसीलदार) डॉ. मयूर कळसे रुजू झाले आहेत. ते डॉक्टर असून बीएएमएस, एम एस पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. डॉ.मयूर कळसे हे २०१९ च्या बॅचचे तहसीलदार आहेत. सध्या ते परिविक्षाधीन काळात सेवा देत आहेत.[ads id="ads2"]
त्यांनी या आधी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पंचायत समिती येथे जवळ- जवळ वर्षभर गटविकास अधिकारी म्हणून पदभार सांभाळला होता. रावेर येथे नायब तहसीलदार म्हणून परिविक्षाधीन तहसीलदार डॉ. मयूर कळसे रुजू झाले. ते रूजू झाल्याने त्यांचा रावेर येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.