आज दिनांक 25 रोजी सकाळी घडलेली घटना
यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीतील विकसित कॉलनीतील सांडपाणी यावल भुसावल रोडवर महामार्गावर भर रस्त्यावर येत असल्याने महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यात आज गुरांचा चारा म्हणून कुट्टी वाहतूक करणारे सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले.[ads id="ads2"]
या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल,आणि यावल नगरपरिषद यांचे संयुक्तिकरित्या दुर्लक्ष होत असल्याने यांनी या महामार्गाच्या बाजूला तात्काळ गटार बांधकाम करून उपाययोजना करावी तसेच गटारीवर दोन तीन ठिकाणी मजबूत ढापे फरशी ठेवून शेतकऱ्यांना येण्या जाण्याची व्यवस्था सुद्धा करावी असे यावल शहरात बोलले जात आहे ही व्यवस्था तात्काळ न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने अजय बढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.