यावल (सुरेश पाटील) यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी रिक्त पदी जळगाव जिल्हा परिषद कार्यालयातील ग्रामपंचायत सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांची तात्पुरत्या पद्धतीने पदस्थापना गुरुवार दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव सु.दे. आंबेकर यांनी केली होती आणि आहे परंतु श्रीमती गायकवाड या गेल्या आठ दिवसात यावल पंचायत समिती कार्यालयात हजर न होण्या मागचे नेमके कारण काय? [ads id="ads1"]
आणि सरळ मंत्रालयातून ऑर्डर असताना गायकवाड यांना हजर होऊ न देण्यासाठी आणि मयत एकनाथ चौधरी हेच यावल येथे बीडिओ म्हणून कार्यरत राहण्यासाठी यावल पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या एका कर्मचाऱ्यासह राजकीय हालचाली कोणकोणत्या आणि कोणामार्फत झाल्यात ? आणि योगायोगाने प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी अपघातात बळी पडल्याने या घटनेस नेमके जबाबदार कोण? याचे जी.प.सिईओ यांनी शासकीय कर्तव्य म्हणून तसेच वैयक्तिकरित्या आत्मचिंतन करून कोणत्याही राजकारणाला आणि राजकीय प्रभावाला बळी न पडता नि:पक्षपणे संबंधितांवर कारवाई केली पाहिजे हीच खरी श्रद्धांजली अपघातात बळी पडलेल्या बीडिओ एकनाथ चौधरी यांना ठरणार आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.17 नोव्हेंबर 2022 रोजी मंजुश्री गायकवाड यांची यावल गट विकास अधिकारी पदी पदस्थापना सरळ मंत्रालयातून करण्यात आली परंतु त्या दि.17 पासून यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी म्हणून दि.22 नोव्हेंबर 2022हजर का झाल्या नाहीत?आणि त्या हजर होऊ नये म्हणून यावल यावल पंचायत समिती कार्यालयातील एका माहीतगार आणि ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यासह इतर कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला.याबाबत तसेच श्रीमती गायकवाड या मागील काही महिन्यापूर्वी यावल पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना पंचायत समिती कार्यालयातील त्या कोणत्या एका कर्मचाऱ्याबाबत कार्यालयीन कामकाजाबाबत अविश्वास व्यक्त करीत होत्या? आणि त्या आता पुन्हा गटविकास अधिकारी म्हणून आल्यानंतर पंचायत समिती मधील त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार निर्णय घेतले जाणार नाहीत या हेतूसह अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी या शासकीय प्रशासनाच्या दिरंगाई, हलगर्जीपणामुळे आणि काही ठराविक राजकीय प्रभावामुळे मात्र बीडिओ एकनाथ चौधरी यांचा अपघातात बळी गेला ही घटना प्रशासनाला एक आव्हान आहे.
यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून अनेक पदावर कोणाच्या आशीर्वादाने ठाण मांडून आहेत आणि अशा कर्मचाऱ्यांकडे यावल पंचायत समिती व जि.प. जळगाव कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजकीय प्रभावामुळे तसेच कर्तव्यात कसूर करीत अक्षम्य असे दुर्लक्ष झाल्याने आता तरी समय- सूचकता बाळगून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
माहिती अधिकारासह ईतर अनेक प्रकरणे प्रलंबित का ?
यावल तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झालेल्या माहिती अर्जाची प्रकरणे प्रथम अपिल म्हणून तसेच इतर अनेक योजनांची कामे निकृष्ट प्रतीची झालेली असल्याच्या तक्रारीं व इतर काही महत्त्वाच्या तक्रारी यावल पंचायत समिती कार्यालयात प्रलंबित आहेत या तक्रारी वेळेवर गटविकास अधिकारी यांच्यासमोर संबंधित कर्मचारी आपल्या वैयक्तिक हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने सादर करीत नसल्याने किंवा प्रकरणांचा निपटारा वेळेवर करीत नसल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आणि यातीलच काही प्रकरणे नाशिक माहिती आयुक्ताकडे दाखल झाल्याने त्या ठिकाणी तारखेवर हजर राहण्यासाठी ज्या अधिकाऱ्याचा काडी मात्र संबंध नव्हता त्या अधिकाऱ्याचा बळी गेल्याने याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.