अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण न काढल्यास शासनाकडून लवकरच अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय गायरान व गुरचरण जमीन शेतकऱ्यांनी आणि रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई (High Court,Mumbai) यांचे कडील जनहित याचिका मधील दि.१५ व दि.०६ च्या आदेशान्वये शासकीय व गावरान जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत या वर्षाअखेर निष्कासित करण्याबाबत आदेशित केलेले आहे. Jalgaon जिल्हयातील तालुकानिहाय शासकिय व गायरान जमीनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यांत आली आहे.[ads id="ads2"]
सदरहू शासकीय तसेच गायरान जमीनींवर कोणत्याही व्यक्तीने,कोणत्याही प्रयोजनासाठी विनापरवानगीने वापरात आणुन त्यावर अतिक्रमण केले असेल अशा सर्व व्यक्तींनी सदरचे अतिक्रमण स्वतःहून २४ तासांत काढून घ्यावे व शासनास सहकार्य करावे. अतिक्रमणधारकाने स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनातर्फे अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
रावेर तालुक्यात ६२० जणांना नोटीस
रावेर तालुक्यामध्ये ७ सजा,मंडळे आहेत. त्यामध्ये अंदाजीत सुमारे ९० हेक्टर च्या वर क्षेत्राच्यावर गायरान व गुरचरण क्षेत्र आहेत. त्यापैकी अंदाजित सुमारे ६२ हेक्टरवर शेतीसाठी आणि रहिवासासाठी अतिक्रमण झाले आहे.
हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर
हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व कागदपत्रे फक्त 2 मिनिटात मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर
हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
Raver तालुक्यातील भामलवाडी, बलवाडी, मांगलवाडी, कुंभारखेडा, आटवाडे, खिरवड, रायपूर, रसलपुर, आणि निंभोरासिम अशा ९ गावांमधील ६२० अतिक्रमण धारकांना तहसीलदार उपाराणी देवगुणे यांनी दि. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी नोटीस बजावली आहे.सर्वाधिक अतिक्रमण हे रायपूर येथे झालेले असून तब्बल २७६ लोकांनी शेती व रहिवासासाठी ६.२३ हे. क्षेत्रावर अतिक्रम केलेले आहेत. तसेच खिरवड येथील १५० जणांनी १.४५ हेक्टर जमीनिवर अतिक्रमण केलेले असून सर्वाधिक शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमासाठी अटवाडे गावातील १५० नागरिक गायरान जमीन अतिक्रमण आघाडीवर असून फक्त रहिवासासाठी तब्बल ४०.७१ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचे शासकीय आकडे वरून दिसून येत आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल (Aman Mittal,Jalgaon Collector) यांच्या दि.१९ नोव्हेंबरच्या आदेशान सर्व गायरान गुरचरन अतिक्रमण धारकांना तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी महसूल यंत्रणे मार्फत स्वतः हून अतिक्रमण काढून घेण्या बाबत यापूर्वी नोटीसा दिलेल्या आहेत. तरी पुन्हा अतिक्रमण धारकांनी आपआपली अतिकमणे २४ तासाच्या आत स्वतः हून काढून घेवून शासनास सहकार्य करावे असे आवाहन गायरान, गुरचरण अतिक्रमण धारकांना केले आहे.



