यावल पंचायत समितीच्या शासकीय गाडीचा अपघात ; यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (फिरोज तडवी) यावल येथील पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटेच्या पाच वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने यावल येथून नाशिक येथे शासकीय कामानिमित्त जात असताना शासकीय गाडी क्रमांक MH 19 D V 4199 या गाडीने कामासाठी जात असताना धरणगाव तालुक्यातील भोने फाट्या जवळ पावणे सहा वाजेच्या सुमारास गाडीचा अपघात होऊन ते जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. [ads id="ads1"] 

  तर गाडीवरील ड्रायव्हर ला किरकोळ प्रमाणात दुखापत झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याने एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्या ठिकाणी गाडी ट्रकवर आदळली गेली त्यात ते जागीच ठार झाले. [ads id="ads2"] 

. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून ते यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते त्यांचा स्वभाव मीतभाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!