राष्ट्रवादी काँग्रेसचे महावितरणाच्या लेखी आश्वासना नंतर आंदोलन अखेर स्थगित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नाशिक  ( मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात असलेल्या करही ग्रामपंचायत हद्दीतील घुगे वस्ती येथील डि.पी. गेल्या वर्षापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना विविध समस्यांना तोड द्यावी लागत आहे. [ads id="ads1"] 

  डीपी बंद असल्यामुळे व इतर काळात शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वरवर पाठपुरावा करून देखील महावितरणाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनमाड शहराच्या वतीने वीज महावितरणाच्या एफ‌.सी.आय रोडवरील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. वीज महावितरणाच्या विरोधी घोषणांनी आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यानंतर वीज महावितरणाचे उपकार्यकारी अधिकारी संदीप शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले.[ads id="ads2"] 

        या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, मनमाड शहराध्यक्ष दीपक घोंगडं, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष हबीबभाई शेख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, नांदगावचे रामू दादा पवार, तानसेन जगताप, करही येशील साईनाथ दराडे, सुधाकर घुगे, संजय घुगे, भाऊसाहेब लहिरे, प्रकाश पवार, दिलीप डोंगरे, अशोक राख, बापू लहीरे, आप्पा राख, पंतीराम घुगे, वाल्मीक लहीरे, भाऊसाहेब पवार, अण्णा सानप, केशव सानप, सागर लहिरे, भारत दराडे, सुनील अहिरे आदी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!