रविवार दि.20 रोजी चोपड़ा येथे कांताई नेत्रालया तर्फे मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर : अत्याधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने नेचर तपासणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) चोपडा येथे कांत्राई नेत्रालय जळगाव व चोपडा येथील कांताई व्हीजन सेंटर तर्फे रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी कॉलेज समोर सहकार कॉलनीत कांताई व्हीजन सेंटर मध्ये मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया तसेच अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे तरी रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असे आवाहन कांताई नेत्रालय जळगाव यांचे व्यवस्थापक अमर चौधरी यांनी व चोपडा येथील जनसंपर्क अधिकारी युवराज देसरडा आयोजकांनी केले आहे.[ads id="ads1"] 

        शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून फक्त २००० /- रुपयात इम्पोर्टेड लेन्स सह (SICS पध्दतीने )मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येईल.

      ज्या रुग्णांना फेको मशिनद्वारे ऑपरेशन (घडीची लेन्स घालून ) करावयाचे असल्यास रु.५०००/- पासून पर्याय उपलब्ध आहेत.[ads id="ads2"] 

डोळ्याची साय काढण्याचे ऑपरेशनसाठी रु २५००/- आकारले जातील.विशेष म्हणजे शिबीरात उच्च दर्जाच्या अल्कोन इन्फिनीट मशिनद्वारे फेकोसर्जरी शिबीराचे ठिकाणाहून जगळगांव स्थित कांताई नेत्रालय येथे आणण्याची व नेण्याची मोफत सुविधा आहे.रुग्णांसाठी चहा,नाश्ता,भोजन,व राहण्याची विनामूल्य सेवा आहे.

हेही वाचा :- जळगाव : हरताळा फाट्याजवळ एस.टी. बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी

         शिबीरासाठी सविस्तर माहितीसाठी कांताई नेत्रालय जळगाव यांचे जनसंपर्क अधिकारी युवराज देसर्डा मो.9423091559, 9096065153

यांच्याशी संपर्क साधावा मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिरात सोबत रेशन कार्डची झेरॉक्स आणणे बंधनकारक राहील असे आयोजक कांताई नेत्रालयाचे व्यवस्थापक अमर चौधरी यांच्यासह जनसंपर्क अधिकारी युवराज देसर्डा संबंधित नेत्र चिकित्सक डॉ.यांनी केले आहे यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!