1 खिडी बु येथे निविदा सूचना क्रमांक4 सण 21/22 हे टेंडर ऑनलाईन असताना त्यामध्ये टेंडर भरण्यात आले परंतु टेंडर ओपन करण्यासाठी 30 टक्के कमिशन रक्कम मागण्यात आली कमिशन रक्कम देण्यास नाकारले असता टेंडर रद्द करण्यात आले अशा प्रकारचे खिर्डी गाव येथे सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे व दलित वस्ती अंतर्गतगावामध्ये निष्कृष्ट दर्जाचे काम झालेले असून त्यावर ग्रामसेवक इंजिनियर विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी कुठल्याच पद्धतीची चौकशी करून कारवाई केलेली नाहीये.[ads id="ads2"]
आम्ही 4-1l-2022 ला त्या विरोधाची तक्रारी अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप पर्यंत कुठलीही चौकशी करून कारवाई करण्यात आलेली नाही विस्ताराधिकारी बिडी ओ हे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न व त्यांच्या आशीर्वादातून हे सर्व प्रकार चाललेला आहे त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक हे कोणाला मोजत नाहीये म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक 22 11 मंगळवार ठीक बारा वाजता निदर्शने करण्यात येणार आहे. असा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा :- हरताळा फाट्याजवळ एस.टी. बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी
2 पुरी तालुका रावेर यामध्ये देखील ऑनलाइन टेंडर निघालेले होते त्यामध्ये शासनाचा नियम नसताना अटी शर्ती सरपंच ग्रामसेवक यांनी टाकलेले आहे त्यामध्ये म्हटलेले होते की टेंडर भरण्याआधी एग्रीमेंट फॉर्मवर सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही घेणे अनिवार्य आहे त्याशिवाय टेंडर भरता येणार नाही अशी अटत्या ठिकाणी टाकलेली होती अशी शासनाच्या नियमानुसार टाकता येत नाही परंतु टेंडर मॅनेज करून देण्यासाठी नेहमीच्या ठेवलेल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी टाकण्यात आलेली होती. याच्याविरुद्ध देखील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तक्रार करण्यात आलेली होती व्हिडिओ मॅडम व विस्तार अधिकारी यांना व्हाट्सअप वर तक्रारी अर्ज देण्यात आलेला होता त्यावेळेस सुट्टी असताना म्हणून व्हाट्सअप वर मेसेज करण्यात आले त्यानंतर दिनांक 27 10 रोजी पंचायत समितीचे तक्रारी अर्ज केलेला आहे पण त्यावर देखील अद्याप पर्यंत चौकशी केली किंवा कारवाई केली नाही टेंडर फ्लॅश केल्यानंतर त्याची मुदत संपल्यावर आठ दिवसानंतर टेंडर ओपन केली पाहिजे होते परंतु आज 20 ते 25 दिवस झाले टेंडर ओपन केलेला नाही अशा पद्धतीने शासनाच्या आदेशाचे पायमल्ली होत आहे व हे सर्व टक्केवारीमुळे घोल चाललेला आहे यांच्यावर कारवाई वेळ म्हणून दिनांक 22 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन निदर्शने घेण्यात येणार आहे
3 आहेरवाडी येथील ये ई-निविदा ओपन करत नसल्याने मुदत संपल्यावर देखील टेंडर ओपन होत नाहीये त्या ठिकाणी देखील टेंडर रद्द करण्याचे हालचाल सुरू आहे असे पंचायत समितीला तक्रारी अर्ज केलेला आहे परंतु पंचायत समितीने अद्याप पर्यंत चौकशी करून कारवाई केली नाही या टेंडर मध्ये त्यांच्या मर्जीचे लोक व ठेकेदार असल्याने या टेंडरमध्ये दुसरे लोक आल्याने हे टेंडर ओपन करण्यासाठी टाळाटाळ करत आहे व टेंडर रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे घोळ चालू आहे विस्ताराधिकारी व्हिडिओ मॅडम यांचा आशीर्वाद असल्याने हे सर्व लोक मन मर्जीप्रमाणे वागत आहे म्हणून चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक 22 11 रोजी ठीक बारा वाजता निदर्शने करण्यात येणार आहे
रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षाने वर्षापासून एकच ठेकेदार काम करत आहे त्यामुळे ज्या मुलांनी शिक्षण घेऊन बी केलेले आहे सुशिक्षित बेरोजगार आहे अशा पोरांना संधी मिळत नाही रोजगार मिळत नाहीये त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार पोर हे बेरोजगारीकडे यांचा प्रमाण वाढलेला आहे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत तालुक्यामध्ये ई टेंडर इमानदारीने व मिनिट प्रमाणे झाले पाहिजे जो योग्य असेल त्याला टेंडर देण्यात यावे व शासनाच्या अटी शर्ती नियमाप्रमाणे चांगले काम करून घ्यावे या सर्व मागण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 22 11 रोजी निदर्शने करण्यात येणार आहे असे पत्रकार परिषदेतून आव्हान करण्यात येत आहे पत्रकार परिषदेत उपस्थित कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी तालुकाध्यक्ष विकी तायडे एक्स मेन जिल्हाध्यक्ष सुनील तायडे सचिव कमलाकर गाडे युवा तालुकाध्यक्ष महेंद्र तायडे तालुका संपर्क भीमराव तायडे तालुका उपाध्यक्ष सुरेश ठा कणे, संपर्क प्रमुख राजेंद्र वाघ,सहसचिव राहुल लहासे,तालुका उपाधक्ष विनोद मोरे,सागर गोमटे,अक्षय वाघ ई कार्यकर्ते उपस्थित होते.