रावेर तालुक्यातील रसलपुर येथील बंद दुकान फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लांबविला ; रावेर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील रसलपुर (Rasalpur Taluka Raver) येथील बंद दुकान फोडून रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रावेर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"] 

रावेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश उर्फ नंदू लक्ष्‍मण महाजन (वय-४६) रा. रसलपुर ता.रावेर(Rasalpur Taluka Raver Dist Jalgaon) हे आपल्या कुटुंबीयांसह Rasalpur येथे वास्तव्यास आहे. निलेश यांचे योगेश्वर ट्रेडर्स (Yogeshear Traders Rasapur) नावाचे Rasalpur गावातच दुकान आहे. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सुमारे रात्री आठ वाजता ते दुकान बंद करून ते घरी गेले होते. [ads id="ads2"] 

  मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा मागील बाजूचा दरवाजा (Door) तोडून दुकानातील २ हजार रुपयांची रोकड आणि ८ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (CCTV Camera DVR) चोरून नेला. हा प्रकार बुधवारी दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आला आहे.

हेही वाचा :- हरताळा फाट्याजवळ एस.टी. बस व चारचाकीचा भीषण अपघात ; दहा प्रवासी जखमी

 याबाबत नीलेश महाजन यांनी रावेर पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे(Raver Police Station) पोलिस नाईक जगदीश पाटील करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!