रावेर येथील न्यायालयात आयोजित लोक अदालतीत 69 प्रकरणाचा निपटारा तर 8 लाख 28 हजार 400 रुपयांची वसुली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) घराघरातील भांडण पती-पत्नीचे वाद भावा-भावात असलेले वाद समाजाच्या सर्वच घटकातील आपआपासतील भांडण,तंटे,प्रलंबित खटले लोकल अदालती मध्ये मिटवावेत कारण लोक अदालतीमध्ये केस काढली तर वेळ वाचतो पैसा वाचतो म्हणून जास्तीत जास्त केसचा निपटारा करावा असे आवाहन न्यायाधीश पी. पी.यादव यांनी केले.[ads id="ads1"] 

 रावेर येथे दिनांक 12 नोव्हेंबर शनिवार रोजी आयोजित लोक अदालतीत 69 प्रकरणाचा निपटारा तर 8 लाख 28 हजार 400 रुपयांची वसुली झाली.

सर्वप्रथम सकाळी १०:३० वाजता रावेर (Raver Court) येथील दिवाणी न्यायाधीश श्री पी पी यादव यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून प्रतिमा पूजन व समई प्रज्वलित करून लोक अदालतीचे उद्घाटन केले. [ads id="ads2"] या कार्यक्रमाची प्रस्तावना रावेर वकील संघाचे (Raver Vakil Sangh) अध्यक्ष एस बी सांगळे यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गजरे यांनी केली तर आभार वकील संघाचे सचिव एडवोकेट शितल जोशी यांनी मानले.

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

 या कार्यक्रम प्रसंगी एडवोकेट व्ही पी महाजन,एडवोकेट योगेश गजरे, एडवोकेट मुजाहिद्दीन शेख, एडवोकेट अमोल कोंघे, एडवोकेट विनोद कोंघे, एडवोकेट तुषार चौधरी, एडवोकेट टी पी माळी, यांचेसह आदी वरिष्ठ विशेतज्ञ हजर होते पॅनल एडवोकेट म्हणून दीपक निळे यांनी कामकाज पाहिले.

     या लोकअदालती मध्ये बँक अधिकारी,बीएसएनएल अधिकारी, महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ अधिकारी, व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हजर होते.तर यावेळी पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सदर लोक अदालत यशस्वी होण्याकरिता श्री बीडी सोनवणे सहा अधिक्षक श्री सी. डब्ल्यू. बिराडे सहा. अधीक्षक श्री बी.एस.बारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!