नाशिक (मुक्ताराम बागुल) जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरा जिल्हा परिषदेच्या गटातील आमोद येथील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी जनता दरबार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार व नांदगाव तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न झाला.[ads id="ads1"]
नांदगाव तालुक्यातील जनतेशी संवाद साधत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार आणि नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्वासांना कांदे यांनी सगळ्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे झालेली नुकसान, अनियमित होत असलेला वीज पुरवठा आणि पिक विमा याकडे लक्ष वेधले. घरकुल योजना यावेळी जनता दरबार मध्ये मांडल्या. आता केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्यामुळे समस्या लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि नांदगाव तालुक्याचे आमदार श्वासांना गांधी यांनी यावेळी दिले.[ads id="ads2"]
या कार्यक्रमाची वेळी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे, नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी, नांदगाव तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे, तसेच जयश्रीताई दौंड, दत्तराज छाजेड, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे उपस्थित होते.



