ऐनपुर प्रतिनिधी :- विजय एस.अवसरमल
रावेर तालुक्यातील निंभोरा गावात पोस्ट ऑफिस चा दरवाज्याचा लॉक तोडून चोरी झाली आहे.सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा गावात वाघोदा वडगाव रोड वर असलेल्या महिपत विठोबा चौधरी विविध कार्यकारी सहकारी संस्था लि.च्या आवारात असलेल्या भारतीय पोस्ट ऑफिस कार्यालयात काल रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने पोस्ट ऑफिस दरवाज्याचे कुलूप तोडून पोस्ट ऑफिस मध्ये ठेवलेली सिमेंट काँक्रिट च्य भिंतीत बंदिस्त केलेली[ads id="ads1"] एक ते दीड क्विंटल वजनाची लोखंडी तिजोरी सिमेंट काँक्रिट ची भिंतीची तोडफोड करून चोरून नेली आहे तिजोरीत रोख रक्कम रुपये 22689/- व 980 रुपयाच्या भारतीय पोस्टल ऑर्डर असा मुद्देमाल चोरून नेलेला आहे पोस्ट ऑफिस चे उप डाकपाल प्रभाकर मीठाराम चौधरी वय 56 वर्षे राहणार भुसावळ यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून[ads id="ads2"] घटना स्थळी फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे साहेब ए.पी.आय.आखेगावकर साहेब एल. सी. बी. चे नजन पाटील साहेब पी एस आय काशिनाथ कोळंबे साहेब डॉक स्टाफ व फिंगर प्रिंट स्टाफ यांनी भेट दिली असून पाहणी केली आहे अज्ञात चोरांविरोधात निंभोरा पोलिस स्टेशनला पो. स्टे.गु. र. नं 190/22 भा. द.वि.कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आखेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस.आय काशिनाथ कोळंबे साहेब विकास कोल्हे ए एस आय राका पाटील ईश्वर सोनवणे हे करीत आहे.


