जळगाव जिल्हा कारागृहातील २६ वर्षीय बंदीने खिळा गिळून आत्महत्येचा प्रयत्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 जळगाव जिल्हा न्यायालयाने Jalgaon District Court) जामीन नामंजूर केले म्हणून २६ वर्षीय बंदीवानाने जिल्हा कारागृहात बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी सकाळी घडली.[ads id="ads2"] 

आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात (Jilhapeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन पितांबर सोनार असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बंदीवानाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.[ads id="ads1"] 

अधिक माहिती अशी की, चेतन सोनार हा २४ ऑगस्ट २०२० पासून जिल्हा कारागृह (Jalgaon District Court) येथे भादंवि ३५४, ३७६, पोस्को अंतर्गत न्यायालयाच्या आदेशाने बंदी आहे. गुरूवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास त्याने कारागृहातील बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कारागृह शिपाई अरविंद म्हस्के यांच्या लक्षात आली.

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या  हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा

   त्यांनी लागलीच ही बाब तुरूंग अधिकारी संतोष पवार यांना कळविली. पवार यांनी बंदी चेतन सोनार याची विचारपूस केल्यावर त्याने न्यायालयाने जामीन नामंजूर केला म्हणून खिळा गिळून घेतल्याचे सांगितले. पवार यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलवून बंदीवानाला जिल्हा कारागृहात उपचारार्थ नेले. एक्स-रे रिपोर्ट काढल्यावर बंदीवानाने खिळा गिळल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!