Dharangaon : पिंप्री खु - भारतीय संविधान दिनानिमित्त आदर्श प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम संपन्न ; संविधान जागृती प्रभात फेरीने वेधले सर्वांचे लक्ष..!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

✒️ धरणगांव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर

धरणगाव - भारतीय संविधान दिनानिमित्त पिंप्री खु ता धरणगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रम संपन्न झाले. भारतीय संविधान हा भारत देशाचा पाया आहे . संविधान सर्वांना मौलिक अधिकार देत आपले हक्क व कर्तव्य यांची जाण करून देते. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. [ads id="ads1"] 

. 26 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय संविधान दिवस निमित्ताने मोठ्या उत्साहात शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . या वेळी प्रभात फेरी संविधान सन्मान रॅली काढून विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचा विजय असो अश्या घोषणा देत आपला आदर व्यक्त केला . त्याच प्रमाणे विद्यालयात निबंध ,चित्रकला , व प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी विध्यार्थ्यांना व शिक्षकांना सामूहिक संविधान शपथ देण्यात आली.[ads id="ads2"] 

 प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद मधुकर चौधरी यांनी प्रतिमा पूजन केले या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ व्ही एम चौधरी , उपशिक्षक आर आर पावरा आदी उपस्थित होते . एस के शिंदे यांनी संविधान विषयावर माहिती दिली तर आर एस पाटील सर यांनी संविधान आपल्याला जीवनात कश्या प्रकारे आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला . सूत्रसंचालन शरीफ पटेल यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!