
रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी)
रावेर येथील विश्रामगृहात 25 नोव्हेंबर शुक्रवार रोजी प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार दिव्यांग संघटना क्रांती यांची बैठक संपन्न झाली.[ads id="ads1"]
माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, अनिल भाऊ चौधरी. यांच्या अध्यक्षतेखाली ,तसेच प्रहार दिव्यांग संघटना क्रांतीचे जिल्हाध्यक्ष ,"माननीय बाळासाहेब पाटील, यांच्या मार्गदर्शनाने ,रावेर येथील विश्रामगृहात प्रहार जनशक्ती पार्टी ,आणि प्रहार दिव्यांग संघटना क्रांती ची, विशेष बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रावेर यावल विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार माननीय "अनिल भाऊ चौधरी ,यांच्या येणाऱ्या 8 डिसेंबर रोजी वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा यावर चर्चा करण्यात आली. [ads id="ads2"]
तसेच 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस कशा पद्धतीने साजरा करायचा, या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत अपंगांच्या घरकुला विषयी समस्या मांडण्यात आल्या. घरकुलाचा लाभ घेण्यापासून जळगाव जिल्ह्यातील भरपूर अपंग वंचित आहेत. घरकुलाचा लाभ घेण्यासाठी अपंगांना शासकीय कार्यालयात भरपूर चकरा माराव्या लागत आहेत; शासन जीआर नुसार एसटी एससी मध्ये येणाऱ्या अपंगांना शबरी, आणि रमाई, या योजनेमध्ये लगेच लाभ देता येतो, असे शासकीय अधिकाऱ्यांचे सांगणे आहे. (मग ओबीसी, आणि जनरल ,मध्ये येणाऱ्या अपंगांना न्याय कसा मिळेल? असा सर्वच अपंगांचा प्रश्न आहे. त्यासाठी अपंग ही एकच जात असून सर्व सपंगांना सरसकट घरकुल या योजनेमध्ये लाभ मिळावा .अशी अपंगांचे अपेक्षा आहे .अपंगांचे सर्वच प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून सोडवले जातील असे प्रहार दिव्यांग संघटना क्रांतीच्या वतीने सांगण्यात आले.
त्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टीमध्ये नियुक्तीपत्र देऊन पुढील पदे देण्यात आले. जयेश चौधरी ,यांचे रावेर तालुका सचिव पदी निवड करण्यात आली. तसेच फिरोज तडवी, यांची रावेर तालुका संपर्कप्रमुख. म्हणून निवड करण्यात आली .शाकीर शेख ,यांची युवक रावेर शहर उपाध्यक्षपदी .निवड करण्यात आली .तसेच सुधीर पाटील ,यांना तालुका संपर्कप्रमुख. म्हणून पद देण्यात आले. त्या ठिकाणी उपस्थित रावेर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ धांडे, तालुका युवा अध्यक्ष योगेश भाऊ निकम, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष वसीम भाऊ, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अध्यक्ष विनोद कोळी. दिव्यांग कार्याध्यक्ष दिनेश सैमिरे.
दिव्यांग संघटक आनंदा कोळी, दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील, अजन्दा शाखाप्रमुख मुरलीधर पाटील, सुलवाडी शाखाध्यक्ष गोपाल कोळी ,विकास भाऊ पाटील, शुभम पाटील ,रावेर शाखाप्रमुख सय्यद अफसर ,शाहरुख भाई, आरिफ भाई ,इत्यादींची उपस्थिती त्यावेळेस होते.

