ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल)
दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी रावेर तालुक्यातील विटवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वप्रथम विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेस गावचे प्रथम नागरीक सरपंच भास्करराव चौधरी यांच्या हस्ते माल्यअर्पण करण्यात आले.
व संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.याप्रसंगी सामजिक कार्यकर्ते नरेंद्र वानखेड़े व जनक्रांति मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वानखेड़े यांनी संविधाना बद्दल माहीती दिली. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य,दिपक मनुरे, गजानन कोळी,मुकेश चौधरी,जनक्रांति मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्रीराम कोळी, सुपडु वाघ, वना कोळी, वसंत म्हसाने संघर्ष मित्र मंडळ रवि अढागळे,मिथुन वानखेड़े,कैलास मनुरे, कुणाल अढागळे, नयन जैन, कर्मचारी व गावातील गावकरी , तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


