ग्रामपंचायत कार्यालया कडून रस्त्यावरील कचरा समस्या सुटेना..
ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपुर ग्रामपंचायत ला सन २०१२/१३ मध्ये स्वच्छ व निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला असून खिर्डी ऐनपुर रस्त्यावर वाल्मिक नगर फलका जवळ रोड शेजारी असलेल्या लोकवस्तीतून कचरा आणून टाकला जात आहे ह्या कचरा विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीला मुहूर्त सापडेना..[ads id="ads2"]
सविस्तर वृत्त असे कि, ऐनपुर बस स्टॅन्ड परिसराला लागून असलेल्या वाल्मिक नगर जवळ खिर्डी ऐनपुर रस्त्यावर बऱ्याच वर्षांपासून रस्त्याच्या शेजारच्या लोकवस्तीतून कचरा आणून टाकला जात आहे मोठ्याप्रमाणात कचरा उकिरडा तयार झाला आहे या उकिरडा जवळ महीला सार्वजनिक शौचालय असून शौचालयात जाण्यास रस्ता सुध्दा नाही शौचालयात जाण्यास मोठी कसरत महीलांना करावी लागत आहे.[ads id="ads1"]
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असून संर्प असण्याची शक्यता आहे वाल्मीक नगर येथे असलेल्या शासकीय भूखंडावर काही लोकांनी शेणाचे उकिरडे टाकलेले आहे रहिवाशी लोकवस्तीत असलेल्या उकिरड्यावर डास व मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी अत्यन्त वाईट परिस्थिती याठिकाणी झालेली आहे तरी त्याबद्दल वारंवार ग्रामपंचायत कडे लेखी तक्रार तसेच तोंडी सूचना देऊन सुद्धा काही उपयोग होतं नाही ग्रामपंचायत ला जाग येऊन मुहूर्त सापडेल का? असे नागरिकांकडून बोलले जात आहे कालावधी लोटत आला तरी त्यावर कचरा व उकिरड्यांचा विल्हेवाट लावण्यासाठी ग्रा.प.ला त्याचा विसर पडला कि काय? कि त्यासाठी नवीन मुहूर्त शोधताय हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.?
तसेच ऐनपुर हे मुख्य बाजारपेठे चं गाव असून ८ते १०खेड्या पाड्यातील लोक, महिला वर्ग येथे बाजार, किराणा, कपडे, दवाखाना तसेच इतर सामान खरेदी साठी येत असतात.तसेच 100 च्या वर विद्यार्थी/विद्यार्थिनी येथे रोज शिक्षणासाठी येत असतात.महिला, विद्यार्थी किंवा पुरुष यास रस्त्याने जाण्यास विचार करावा लागतो.व त्यात शेजारी चं काही नागरिकांचे घर असून महिला सतत वावरत असतात.त्यात खाली सगळीकडे घाण असल्याचे दिसते त्याचबरोबर घाणीची दुर्गंधी येत असल्याने त्यांना त्यांचे दरवाजे व वापर बंद ठेवावा लागत असून नाहक त्रास तसेच दुर्गधी चा सामना करावा लागत आहे.
त्याच बरोबर आठवडे बाजार वा इतर दिवशी या रस्त्याने जाण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे अशी स्थिती आहे.तरी ग्रामपंचायत ने लवकरात लवकर महत्वाचे व अत्यावश्यक,विषयाचं गांभीर्य लक्षात घेता उपाय योजना करावी अशी मागणी राहिवाशी व नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.
1) प्रतिक्रिया...
ऐनपुर ग्रा.प.ची उदासीनता आहे एक ते दीड वर्ष झाले परंतु सदस्यांमध्ये कुठला ही ताळमेळ नाही.वार्ड प्रतिनिधी सदस्य , कर्मचारीयांची नेहमी या ठिकाणाहून ये-जा असते तरी त्यांचे या विषयाकडे लक्ष असून सुद्धा न दिसल्यासारखे होतं आहे.तसेच तत्कालीन ग्रा.वि.अधिकारी.सरपंच सदस्य यांचे सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष असून या मुळे नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे .
--ज्ञानेश्वर विश्वनाथ महाजन.



