चिनावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022रोजी चिनावल ता.रावेर जि.जळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी चिनावल गावचे लोकनियुक्त सरपंच सौ.भावनाताई बोरोले यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाच्या प्रस्ताविकेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.[ads id="ads1"]
त्याप्रसंगी युवा क्रांती फाऊंडेशन चिनावल यांच्या तर्फे संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळेस चिनावलचे तलाठी सौ.लिना राणे माजी सरपंच योगेश बोरोले,ग्रामपंचायत सदस्य शेषराज भालेराव,सागर भारंबे युवा क्रांती फाऊंडेशन अध्यक्ष युवराज भालेराव, उपाध्यक्ष दिपक लहासे, सचिव भुषण भालेराव सदस्य दिपक झाल्टे, गौतम ठाकणे,विशाल ठाकरे, लिलाधर भालेराव, रविंद्र गोमटे, सिध्दार्थ भालेराव, गोकुळ गाढे, संजय भालेराव दशरथ भालेराव,विनोद भालेराव,दिपक गाढे उपस्थित होते.


