सावदा - रावेर येथे म्हैशीचा बाजार त्वरित सुरू करावा...म्हैशी खरेदी- विक्री व्यापारी व दुग्ध उत्पादनाकांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नियमितपणे,रितसर म्हैस खरेदी विक्री बाजार त्वरित सुरू करावा अशी मागणी म्हैशी खरेदी-विक्री व्यापारी व रावेर तालुक्यातील दुग्धव्यवसायिक, दुध उत्पादक शेतकरी तसेच सर्वसामान्य दुध खरेदी वर्गाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने रावेर-सावदा या बाजार समितीच्या आवारात नियमितपणे रितसर, शासनाच्या वतीने नियमानुसार म्हैशीची खरेदी विक्री लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे.[ads id="ads1"] 

रावेर -सावदा परिसरात मोठ्या संख्येने दुध उत्पादक शेतकरी,दुध उत्पादक व्यावसायीक तसेच म्हैसी ची मोठ्या संख्येने खरेदी विक्री करणारे लहान छोटे, मोठें व्यवसायिक व ह्या व्यवसायांवर आधारित रिक्षा,गाडी चालकांना ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.याला प्रामुख्याने कारणीभूत शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रावेर - सावदा येथील म्हैशीची, गुरांची खरेदी-विक्री बाजार बंदी होय, [ads id="ads2"] 

  यामुळे बहुतेक म्हैस खरेदी विक्री व्यापारी यांनी ह्या व्यवसायांवर होणारी उलाढाल ठप्प झाली असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने त्यांचे बरेचसे व्यवहारात कोंडी झाली आहे, ह्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्यांच्यांत नैराश्य आले असून ते पुर्णपणे हतलब झाले आहेत, आर्थिक टंचाई, बेरोजगारी, नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा समतोल बिघडला आहे, यामुळे राज्य सरकारने त्वरित म्हैस खरेदी विक्री बाजार सुरू करावा आणि ह्या व्यवसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, ह्या ची मानसिकता मजबूत करण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी, दुग्ध उत्पादनाकांची व्यथा, समस्या,दुध खरेदी सर्व सामान्य ग्राहक व नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी, शासनाने, राज्यकर्ते यांनी निदान म्हैस खरेदी विक्री बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, 

हेही बातमी वाचा:- बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्या नंतर आ.एकनाथराव खडसे काय म्हणाले ?

हेही वाचा :- आपले बँकेत खाते आहे. तर ही बातमी आपल्या कामाची आहे. "या" दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही, जाणून घ्या नवीन नियम 

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडले, आणि लंम्पी आजारांचे प्रमाण सुध्दा आता कमी झालेले दिसून येत आहे. म्हणून शासनाने लवकरात लवकर फेर विचार करून म्हैस खरेदी विक्री बाजार समितीच्या आवारात नियमितपणे रितसर शासनाच्या नियमानुसार म्हैशीचा बाजार सुरू करावा.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!