नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत नांदगाव तालुका प्रतिनिधी म्हणून प्रमोद भाबड यांची बिनविरोध निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नाशिक (मुक्ताराम बागुल) नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत नांदगाव तालुका प्रतिनिधी म्हणून गुलाब उर्फ प्रमोद सुदामराव भाबड यांची आज बिनविरोध निवड झाली. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी हरेश्वर सुर्वे व अनुजा सुशेन आहेर यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने गुलाब भाबडी उर्फ प्रमोद पाबळ यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवडणूक ही बिनविरोध घोषित करण्यात आल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत.[ads id="ads1"] 

        याप्रसंगी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, प्रमोद भाबड यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्ञानदेव आहेर, हरेश्वर सुर्वे, नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश कवडे, [ads id="ads2"] जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, माजी सभापती सुभाष कुटे, विष्णू निकम सर, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर लहाने, नांदगाव नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती डॉक्टर संजय सांगळे, मनमाड चे माजी नगराध्यक्ष योगेश उर्फ बबलू पाटील, संजय आहेर, अविनाश इप्पर, सुनील शेलार, राजेंद्र पवार, अमोल शेठ नावंदर, राजेंद्र देशमुख, आनंद कासलीवाल आधी यावेळी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!