नाशिक जिल्हा प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यासह नांदगाव शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत होत्या. परंतु पोलिसांनी प्रयत्न करूनही चोर ताब्यात येत नव्हते मात्र एका घटनेत मोटरसायकल चोराच्या मुस्क्या आवळण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. [ads id="ads1"]
ताब्यात घेतलेल्या छोट्या कडून अनेक गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता नांदगाव पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाठलाग करून काही तासातच नांदगाव पोलिसांनी तळवाडे येथील वीट भट्टी जवळ झडप घालत चोरट्याच्या मुस्क्या आवडण्यात आल्या . चोरट्यांना पॉलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केलेली मोटरसायकल ताब्यात घेतली.[ads id="ads2"]
चोरीला गेलेली मोटरसायकल नांदगाव पोलिसांनी अवघ्या दीड तासात ताब्यात घेत चोराला जर बंद केले आहे. याप्रकरणी रामचंद्र परसराम आहेर यांच्या तक्रारीवरून आरोपी गणेश शिवाजी सानप यांच्याविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे हा सर्व प्रकार मानसी कलेक्शन जवळ नांदगाव येथे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
हिरो स्प्लेंडर कंपनीची लाल रंगाची एम एच 41 ए डब्ल्यू 1898 ही मोटर सायकल वीस हजार रुपये किमतीची असल्याचे समजते. याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, संदीप बोडके, अनिल शेरेकर, सुनील कुऱ्हाडे आदींनी कार्यवाही केली आहे.



