मजूरावर विळ्याने वार ; सावदा पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद कोळी) एका मजुराला  विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत संशयित महिले विरोधात  सावदा पोलीसात (Savda Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads1"] 

  सावदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दत्तात्रय साळी (वय-४५) रा. बुधवार पेठ, सावदा ता.रावेर जि. जळगाव (Budhvar Peth,Savda Taluka Raver Dist Jalgaon) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शेतीचे काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास  ज्ञानेश्वर साळी हे त्याच्या घरी उभे होते. [ads id="ads2"] 

  त्यावेळी काहीही कारण नसताना आशाबाई खुशाल साळी या महिलेने वेड्याचा असा उल्लेख करून शिवीगाळ करून तिच्या हातातील विळ्याने ज्ञानेश्वर साळी यांच्या तोंडावर वार केले. यामध्ये त्याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे.  तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

हेही वाचा :- Land Record:वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी ? वाचा सविस्तर 

हेही वाचा :- आता तुमची महत्त्वाची सर्व  कागदपत्रे फक्त 2 मिनिटात  मिळवा आपल्या मोबाईल वर ...व्हॉट्सॲप वर

हेही वाचा :- SSC GD Constable 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर : SSC मध्ये बंपर भरती, 24 हजारहून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज

हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर

   ज्ञानेश्वर साळी यांनी सावदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महिला आशाबाई खुशाल साळी हिच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेछा पुढील तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार मेहमूद शहा हे करत आहे. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!