ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथे ग्राम पंचायत मध्ये बिरसा मुंडा जंयती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली पाणी जंगल आणि भुमी साठीची लढाई शतके जुनी आहे या लढाई शेकडो नायक आले आणी गेले परंतु हा लढा आजही कायम आहे आज आम्ही असा मोहक व बंडखोर नेत्या बदल बोलत आहे.[ads id="ads1"]
ज्याच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणी त्यानी इंग्रजाना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजावर वार केले आज आपण बोलत आहे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा ते आदिवासी नेते व लोक नायक होते त्याचा पुर्ण नाव बिरसा सुगान मुंडा होते त्याच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५/ मध्ये झारखंड मधील कुटी जिल्ह्यातील उलिहातु रांची येथे झाला त्याच्या आई नाव करमी हतु होते त्याचा मुत्यु१९०० मध्ये झाला १९ शतकांतील बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे लोक नेते म्हणून उदयास आले आदिवासींना लाभलेला त्याच्या भुमि युध्दाचा वारसा शतकानुशतके प्राचीन आहे.[ads id="ads2"]
मुंडा आदिवासींच्या नेतृत्वात १९ व्या शतकातील नायक बिरसा मुंडा यानी महान असी एक चळवळ उभी केली या चळवळीलाच उलगुलान असे म्हणतात असा या थोर महान भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ऐनपुर ग्राम पंचायत मध्ये साजरी करण्यात आली जयंती निमित्त प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस सरपंच अमोल महाजन यांनी पुष्प हार अर्पण केला व श्री फळ ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी फोडले ग्रा.प. सदस्य किशोर पाटील यांनी दिप व धुप प्रज्वलीत केले.
या प्रसंगी आदिवासी एकतापरिषदेचे तालुका अध्यक्ष प्रकाश भिल्ल व तालुक कोष्याध्यक्ष गुरु बारेला ग्राम विकास अधिकारी एस एन गोसावी अप्पा, अनिल कोळी, पृथ्वीराज कोळी, अतुल पाटील, अरविंद महाजन ,हैदर अली, सलमान खान, विजय अवसरमल, एस कुमार, रविंद्र महाजन ,प्रदिप भिल्ल ,गजानन भिल्ल,दगडू भिल्ल, भगवान भिल्ल,मरू भिल्ल, संदिप भिल्ल, विलास भिल्ल, प्रविण भिल्ल,ईश्वर भिल्ल,अजय भिल्ल, उपस्थित होते.


